Posts

Showing posts from March, 2018

घरगुती उपाय आपल्या सौंदर्य आणि स्वास्थ्यासाठी

Image
आयुर्वेदाने मध्यतरीच्या काळात ओळख गमावली होती. आधुनिक विज्ञानाच्या शोधानंतर परत लोक आयुर्वेदिक इलाजा कडे वळू लागलेली आहे. अनेक कारणांनी आयुर्वेदाने लोकप्रिय केले आहे. त्यापैकी महत्वाचे आधुनिक औषधांप्रमाणे त्याचा कोणताही दुष्परिणाम नाही. दुसरी बाब, आयुर्वेद पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि, आयुर्वेद फक्त एका रोगाचा इलाज करण्याकडे लक्ष देत नाही तर तो संपूर्णपणे निर्मूलनासाठी केंद्रित करतो. १.आपल्या चेहर्याला ताज्या टोमॅटोने रसाने मसाज करा आणि 1 , 2 तासांनंतर चेहरा धुवून घ्यावा. हा साधा आयुर्वेदिक उपाय पीपल्स सारख्या समस्या साफ करण्यात मदत करते आणि चेहऱ्यावर तेज आणण्यास मदत होते. २. रोज सकाळी सफरचंदचा एक पेला रस प्या, आपली त्वचा चमकदार आणि सुंदर बनेल. ३. दररोज गरम पाणी आणि निंबू व मध हे पिण्याची सवय करा, नैसर्गिकरित्या वजन कमी होते. ४. कोरफडचा गर चेहर्याला लावून रोज मसाज केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघतील. ५. नारळाचे तेल व लिंबाचा रस ह्याने १० ते १५ दिवस केसाची मालिश करा आपोआप केसातील कोंढा हि समस्या सुटण्यास मदत होईल.. ६. पावसाच्या पाण्याने केस धुतल्यास केस चमकदार होतात. ७. तसेच ...

सांधेदुखीवर घरगुती उपाय

Image
सांधेदुखीवर घरगुती उपाय वाढत्या वयानुसार सांधेदुखी चा त्रास वाढायला लागतो. चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. अश्या वेळी सांधेदुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो. सामान्य लक्षणे :- काम किंवा हालचाल करताना सांधे दुखणे, सांध्यावर सूज येणे, सकाळी उठल्यावर सांधे दुखने, विशेषतः हात पायाची बोटे जखडणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. सांधेदुखी मध्ये काय खावे :- गहू, तांदूळ, दुधी, दोडका, घोसाळे, तूर, मूग कुळीथ, द्राक्षे, कोहळा, दूध, तूप, लोणी, आले, लसूण, गरम पाणी इत्यादी पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावे. काय खाऊ नये :- वरई, नाचणी, चवळी, वाल, पावटे, कारले, कैरी, कच्चा टोमॅटो, आंबट दही, चिंच, इडली, वैगैरे आंबवलेले पदार्थ खाण्याचे टाळावे. सांधेदुखीवर घरगुती उपाय :- • सांधेदुखी चा त्रास असल्यास दोन चमचे बडीशोप व सुंठीचे तुकडा चार कप पाण्यामध्ये घालून एक कप राही पर्यंत उकळावे व अर्धा चमचा एरंडेल तेल घालून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल. • दोन चमचे सुंठ व दोन चमचे एरंदमुळाची भरड चार कप पाण्यात उकळावे व एक क...

आम्लपित्त उपचार

Image
आम्लपित्त उपचार आम्लपित्त साठी म्हणजे acidity का होते एसीडीटी कमी करण्याचे उपाय पित्त कमी करण्यासाठी घरगुती काही उपाय बघणार आहोत आणि पित्त का होतात त्याचे लक्षण काय आहेत पित्त असताना काय खावे काय खाऊ नये आपण आज माहिती करून घेऊ. लक्षण :- घसा, छाती व पोटामध्ये जडणे, आंबट ढेकर, पोट दुखणे, मळमळणे, डोकेदुखी, उलटी झाल्यावर बरे वाटणे. काय खावे :- तांदूळ, ज्वारी, दुधी, घोसाळे, काकडी, मूग, आवळा, डाळिंब, नारळ, मनुका, वेलची, लोणी, तूप, धने, बडीशोप, जिरे इत्यादी पदार्थ खावे. काय खाऊ नये :- सिमला मिरची, शेवगा, टोमॅटो, चिंच, मेथी, आंबट चुका, कुळीथ, अननस, दही, मद्य, अतिशय तिखट व तेलकट पदार्थ खाऊ नये. आम्लपित्त उपचार :- • सकाळी खाली पोट चार चमचे दुधी भोपळ्याच्या रसात चुमिटभर जिरेपूड टाकून घेतल्यास करपट ढेकर येणे, बैचेन वाटणे कमी होते. • पण चमचा सुंठ व तेवढीच आवळकंठी, अर्धा चमचा खडीसाखर घालून सकाळ संध्याकाळ घ्यावे. • एक वेलची व अर्धा चमचा जिरे खाडीसाखरेसह चावून खाल्ल्यास पोटात होणारी मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे कमी होते. आम्लपित्त घरगुती उपचार :- • गोड डाळिंबाचा रस साखर ...

मानसिक ताण तणाव कमी करण्याचे उपाय

Image
मानसिक ताण तणाव कमी करण्याचे उपाय नमस्कार मित्रानो आयुर्वेदिक उपचार मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही आपल्याला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांच्या वापरामुळे आपण घर च्या घरी एक स्वस्थ आणि शांत जीवन जगू शकतात . बहुतेक रोगांचे मूळ मनात असते. यासाठी मन नेहमी शांत आणि निर्मल असायला पाहिजे. काही व्यक्ती असे काम करता की त्यांची जेवणाची वेळ निश्चित नसते आणि ते विश्रांती ही नीट करत नाही. त्यामुळे मानसिक ताण तणाव वाढतो. अनेकवेळा करावे लागणारे काम आपल्या मनाला आवडेल असे नसते, सतत वरिष्ठांच्या दबाव खाली काम करावे लागते. काम ठराविक वेळेत करून द्यावे लागते यामुळे मानसिक ताण तणाव वाढतो. मानसिक तनाव मुळे रक्तदाब वाढतो ते तर सर्वांना माहितीच आहे पण अजून त्यामुळे मधुमेह, त्वचारोग, अति लठ्ठपणा, ऍसिडिटी, निद्रानाश असे आजार होतात यासाठी सर्व गोष्टी वेळेवर पूर्ण कराव्या म्हणजे आजार दूरच राहतील. मानसिक ताण तणाव सामान्य लक्षणे :- पोट बिघडणे, कामात उत्साह न वाटणे, कामात चूक होणे, चीड चीड होणे, स्मरणशक्ती कमी होणे, त्वचारोग असल्यास तो वाढणे, छातीत धडधडणे, स्वस्थ झोप न लागणे इत्यादी मान...

अपचन घरगुती उपाय

Image
अपचन घरगुती उपाय पोटाचे विकार आणि उपाय मध्ये आज आपण अपचन वर घरगुती उपाय बघुया. मित्रांनो अपचन घरगुती उपाय मध्ये आपण जाणूया अपचन का होते आणि जेवणाचे अपचन नाही होण्यासाठी आपल्याला काय करायला हवे. खाल्लेलं अन्न न पचणे म्हंजेच अपचन होय. जेवण केल्यानंतर जड वाटणे सुस्ती येणे याला अपचन म्हणतात. अपचन झाल्याचे लक्षणे :- पोट जड होणे, जिभेवर पांढरा थर होणे, पोट दुखणे व फुगणे , दिवसभर सुस्त वाटणे, अंग मोडून आल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षण आढळून येतात. अपचन टाळण्यासाठी काय खावे :- मूग, भात, लाह्या, ज्वारी, पपई, संत्रे, दोडका, मेथी, पालक, सुंठ, जिरे, सुरण, लसूण, ताक, गरम पाणी इत्यादी सेवन करावे. अपचन पासून वाचण्यासाठी काय खाऊ नये :- वाटणे, मटार, चावडी इत्यादी कडधान्य, रताळे साबुदाणा, तळलेले पदार्थ, जड मिठाई, थंड पाणी, शिळे पदार्थ इत्यादी पासून दूर राहावे. अपचन घरगुती उपचार :- • जेवणानंतर अर्धा चमचा भाजलेला ओवा, चिमूटभर सैंधवाबरोबर चावून खाल्ल्यास व त्यावर गरम पाणी पिल्यास खाल्लेलं लवकर पचते. • अपचनामुळे पोटात वायू धरत असल्यास, अस्वस्थ वाटत असल्यास अर्ध्या लिंबाबच्या रसात...