मातीच्या माठातील पाणी पिण्याचे फायदे-

◼माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी माठातील पाणी पित होते. आजही बरेच जण माठातील पाणीच पितात. जाणून घेऊया माठातील पाणी पिण्याचे फायदे ◼माती नैसर्गिकरीत्या अल्कलाइन शरीरातील ॲसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून शरीराच्या आतील वातावरण ॲसिडिक असण्यापेक्षा अल्कलाइन असेल तर आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरीत्या अल्कालाइन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाइन होते, असे डॉक्टर सांगतात. ◼कोणतेही हानिकारक रसायने नाहीत. बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. पाणी दूषित होत नाही. ◼नैसर्गिक थंडावा- लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोडशेडिंग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलं...