भूक न लागण्याची कारणे काय?

भूक न लागणे हा प्रकार सामान्य वाटत असेल तरी तो चिंतेचा विषय आहे. भूक न लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यावर एक नजर... 1) आजारी असताना शरिरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचा जास्त वापर होत असतो. अशात भूक कमी लागते किंवा लागतच नाही. 2) विविध प्रकराची औषधे तुम्ही घेत असला तर औषधामुळे कमी भूक लागते. 3) काही कारणास्तव हृदयाची धडधड वाढली कि, पचनक्रीया मंदावते. त्यामुळे देखील तुम्हाला भूक लागत नाही. 4) व्यक्तीच्या शारीरिक हालचाली, व्यायाम, खेळ, ऋतू, त्याची मानसिक स्थिती इ. गोष्टींवर भूक न लागणे अवलंबूृन असते. 5) पाव-बिस्किटांचा अतिरेकी वापर, कॅटबरी, चॉकलेट यासारखे पदार्थ, थंड पदार्थ अन् थंड पेय यांची सवय, भेळ, फरसाण, वेफर्स यांसारख्या पदार्थांचा वापर आणि मैद्याचे पदार्थ यामुळे पोट साफ होत नाही अन् भूक लागत नाही. 6) अन्ननलिकेतून अन्नपदार्थ सामान्य गतीने पुढे सरकरण्यास अडथळा निर्माण झाला कि, भूक कमी लागते. 7) अधूनमधून सारखे काहीतरी काहीतरी खात राहील्यानेही भूक लागत नाही. त्यामुळे दोन जेवणांमध्ये किमान चार तासांचे अंतर असलेच पाहिजे.