दिवसभर सक्रिय राहण्यासाठी उपयुक्त टिप्स!



आपण आहाराशी निगडित लहान गोष्टींकडे फार लक्ष देत नाही. तसेच अशा बऱ्याच गोष्टी खातो जे आपल्या आरोग्याला फायदेशीर नसतात. चला, तर दिवसभर सक्रिय राहण्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील...

1. दररोज भरपूर पाणी (तीन ते चार लिटर) प्या, आणि कॅलरी मुक्त गोष्टींचे सेवन करा. 2. सकाळी न्याहारी घ्या. न्याहारी न घेतल्यानं अनेक आजार होऊ शकतात. 3. रात्री स्नॅक्स घेताना जपूनच खा. 4. दिवसभर दोन जेवणाच्या मध्ये किमान चार तासांचे अंतर असू द्यावे. सारखे काही ना काही खाणे टाळा. 5. आहारात प्रथिने समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. 6. आहारात गरिष्ठ आणि मसालेदार पदार्थ नसावे. 7. खाण्यात लाल, हिरव्या, संत्री रंगाचे पदार्थ आवर्जून घ्या. 8. वजन कमी करण्यासाठी जेवणात मीठ कमी करा. 9. दररोज जेवणापूर्वी कमी कॅलरी असलेले व्हेजिटेबल सूप घ्यावे. यामुळे 20 टक्के कॅलरी कमी खर्च होईल. 10. कॅलरीची संख्या वगळून पोषक घटक असलेला आहार घ्यावा.






Comments

Popular posts from this blog

तोंडात व्रण, छाले, वेदना असणे

मातीच्या माठातील पाणी पिण्याचे फायदे

आम्लपित्त उपचार