Posts

Showing posts from June, 2022

तोंडात व्रण, छाले, वेदना असणे

१) धने पाण्यात उकळवून, थंड करून त्याने गुळण्या करा. २) वेलचीचे चूर्ण मधात मिसळून आतून लावा व लाळ गळू द्या. ३) जाईच्या झाडाची पाने चावल्याने छाले बरे होतात. ४) पेरूच्या झाडाची पाने उकळवून त्या पाण्याने गुळण्या कराव्या. ५) हळद पाण्यात घोळून, मग गाळून या पाण्याने गुळण्या करा. ६) खोबरे चावून खावे व लाळ तोंडात फिरवावी. ७) ज्येष्ठमध खावे व याच्या पाण्याने गुळण्याही करा. ८) मध पाण्यात मिसळून गुळण्या करा. ९) तुळशीची दोन-तीन पाने चावून खा. १०) विड्याच्या पानाचा रस काढून, त्यात तूप टाकून तो लेप व्रणांना, छाल्यांना लावा. ११) ग्लिसरिन लावा. १ २) खाण्याच्या पानाचे चूर्ण करून त्यात थोडा मध टाकून हे चाटण तोंडात आतून लावा. वेदना थांबतील. वरील उपायानी नक्कीच आराम पडेल.