शांत झोप लागण्यासाठी...
शांत झोप लागण्यासाठी... आपल्याला सर्वसाधारणपणे सात तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झोप लागत नाही. काही कारणाने, एखादे टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधे मधे जाग येत राहते किंवा काही लोकांना तर मुळातच झोप लागत नाही. आपल्या झोपेवर ताबा मिळवण्यासाठी सवयी, व्यायाम प्रकार आणि आहार कसा असावा हे जाणून घेऊ १) ध्यानधारण करणे झोपेसाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे ध्यान २) मंत्रोच्चार दिवसातून किमान एकदा तरी ओंकार करावा. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे आपण आपल्या मनात चालणाऱ्या असंख्य विचार किंवा काळज्यांना दूर थोपवू शकतो. ३) योगासने करणे नियमितपणे योग साधना करणाऱ्या लोकांना झोपेचे कसलेच त्रास होत नाही. दिवसातून किमान वीस मिनिटं योगाची प्रॅक्टिस करून शरीर, मन स्वस्थ ठेवणं हा सवयीचा भाग बनून जातो. ४)मसाज करणे झोपेच्या समस्यांसाठी मसाज हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. नियमितपणे मसाज केल्याने झोपेचा दर्जा तर सुधारतोच पण मसाजमुळे टेन्शन, स्ट्रे...