Posts

Showing posts from December, 2018

लहान वयात 'दमा' होण्याची ही आहेत कारणे आणि लक्षणे

Image
दमा हा आजार आता लहान मुलांमध्येही दिसतो. या मुलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आनुवांशिकता याचे मुख्य कारण समजले जाते. परंतु, या आजाराची विविध कारणे आहेत. योग्य वजन असेल तर लहान मुलांचा दम्यासारख्या आजारापासून बचाव होऊ शकतो. साधारण 23 ते 27 टक्के लहान मुलांमध्ये दम्या मुख्य कारण वाढलेले वजन असते. ज्यांचे वजन वाढलेले असते त्यांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो, अमेरिकेतील ड्येक विश्वविद्यालयात 5 लाखांपेक्षा अधिक मुला-मुलींच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानं आढळून आले आहे. ♦️ ही आहेत कारणे 1. काही औषधे सतत घेतल्याने 2. मुलाचे जन्मावेळी कमी असलेले वजन 3. श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव 4. तणाव व शारीरिक कष्ट 5. हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपण 6. वाढते शहरीकरण 7. घरातील ॲलर्जिक घटक 8. वजन जास्त असण ♦️ ही आहेत लक्षणे 1. सतत खोकला येणे 2. श्वास घेताना किंवा सोडताना आवाज येणे 3. श्वास कमी घेता येणे 4. छातीत वेदना होणे 5. घाबरणे 6. अस्वस्थता जाणवणे 7. सतत थकवा जाणवणे ♦️ अशी घ्या काळजी 1. कपडे रोज गरम पाण्याने धुवावेत 2. लहान मुलांना जनावरांपासून दूर ठेवा 3. त्यांना वेळेवर...

नारळ पाणी पिण्याचे फायदे नक्की वाचा!

Image
● आपल्या आरोग्यासाठी नारळ पाणी अतिशय फायदेशीर आहे. कारण यामध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक आढळतात. चला तर याचे फायदे पाहुयात... 250 मिली नारळाच्या पाण्यात पौष्टिक सामग्री अशी कार्ब - 9 ग्रॅम फायबर - 3 ग्रॅम प्रथिने - 2 ग्रॅम आरडीआय व्हिटॅमिन सी - 10 टक्के आरडीआय मॅग्नेशियम - 15 टक्के आरडीआय मॅंगनीज -17 टक्के आरडीआय सोडियम - 11 टक्के आरडीआय कॅल्शियम - 6 टक्के ● नारळ पाण्याचे सेवन शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवते. हे पिण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. ● पोट्यातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्यांमध्येही नारळपाण्यामुळे आराम मिळतो. ● हे आपल्या शरीरास ऊर्जा देते. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्यांतून आराम मिळतो. ● या पाण्यात व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे पोषक असतात. यामुळे तुमचे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ● हे पाणी चेहऱ्यावरील मुरुम काढून टाकण्यास देखील मदत करते. आपण फेसपॅक म्हणून देखील याचा वापर करू शकता. ● उन्हाळ्यात, टॅनिंग काढून टाकण्यासाठी नारळ...