Posts

Showing posts from May, 2022

सोपे आणि सरळ घरगुती उपचार

Image
  1) कॅन्सर होण्याची भीती वाटते -नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किंवा अर्जुनारिष्ट प्या. 3) मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा. 4) किडनी फेल होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी कोथिंबीरचा रस अनुषापोटी प्या. 5) पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या. 6) सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या. 7) टक्कल पडण्याची भीती वाटतेय - वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आंघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा. 8) दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज / कुलर मधील पाणी कधीच पिऊ नका. 9) डायबेटीस होण्याची भीती वाटते - तणावमुक्त जीवन जगा, व्यायाम करा. जागरण टाळा. साखर खाणे बंद करा, गुळ खा. 10) भीतीमुळे झोप येत नाही - रात्री जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.

काही साधे घरगुती उपाय (आयुर्वेद)

Image
 

दिवसभर सक्रिय राहण्यासाठी उपयुक्त टिप्स!

Image
आपण आहाराशी निगडित लहान गोष्टींकडे फार लक्ष देत नाही. तसेच अशा बऱ्याच गोष्टी खातो जे आपल्या आरोग्याला फायदेशीर नसतात. चला, तर दिवसभर सक्रिय राहण्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील... 1. दररोज भरपूर पाणी (तीन ते चार लिटर) प्या, आणि कॅलरी मुक्त गोष्टींचे सेवन करा. 2. सकाळी न्याहारी घ्या. न्याहारी न घेतल्यानं अनेक आजार होऊ शकतात. 3. रात्री स्नॅक्स घेताना जपूनच खा. 4. दिवसभर दोन जेवणाच्या मध्ये किमान चार तासांचे अंतर असू द्यावे. सारखे काही ना काही खाणे टाळा. 5. आहारात प्रथिने समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. 6. आहारात गरिष्ठ आणि मसालेदार पदार्थ नसावे. 7. खाण्यात लाल, हिरव्या, संत्री रंगाचे पदार्थ आवर्जून घ्या. 8. वजन कमी करण्यासाठी जेवणात मीठ कमी करा. 9. दररोज जेवणापूर्वी कमी कॅलरी असलेले व्हेजिटेबल सूप घ्यावे. यामुळे 20 टक्के कॅलरी कमी खर्च होईल. 10. कॅलरीची संख्या वगळून पोषक घटक असलेला आहार घ्यावा.

सकाळ काही चुकीच्या सवयी - अनेक आजारांना निमंत्रण.

Image
  सकाळी जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा आपले शरीर आणि स्नायू खूप सक्रिय असतात. अशा परिस्थितीत आपण सकाळी शरीराबरोबर जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. कोणतीही चुकीची सवय बऱ्याच रोगांना कारणीभूत ठरू शकते. सकाळच्या नाष्ट्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो. याशिवाय काही चुकीच्या सवयींमुळे साखरेच पातळीही अनियंत्रित होते. म्हणून उशीर न करता या चुकीच्या सवयींबद्दल माहिती जाणून घ्या… ▪️नाष्ट्यामध्ये या गोष्टींचा समावेश करू नका- सकाळी घाईघाईत आपण हेल्दी खाण्याव्यतिरिक्त प्रोसेस्ड फुडचा नाष्टा केल्यास आपले वजन अनियंत्रित होऊ शकते. प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. सकाळी जंक फूड खाणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. ▪️सकाळी नाष्टा न करणे- असे बरेच लोक आहेत जे घाईघाईत नाष्टा करत नाही, हे लठ्ठपणा वाढवण्याचे सर्वात मोठे कारण आहे. सकाळ नाष्टा केला नाही तर आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते कारण यामुळे आपली पचनक्रियेमध्ये बिघाड होत आणि मग तुम्हाला पोटाच्या समस्या सुरु होतात. ▪️पाणी न पिणे- ...